Manomay

Post Covid Pulmonary Fibrosis & Ayurvedic Management.

Post Covid Pulmonary Fibrosis & Ayurvedic Management.

● ‘ पल्मोनरी फायब्रोसिस’ हे ‘ पर्मनेंट पल्मोनरी आर्किटेक्चर डिस्टाॅर्शन ‘ म्हणजेच ‘फुफ्फुसांचे कार्य बिघडणे'(Lung Dysfunction) शी निगडित असलेली समस्या आहे .
●कोरोनाच्या संक्रमणा नंतर फुफ्फुसांवर तीव्र परिणाम होण्याची शक्यता असते .हा आजार उद्भल्यास रुग्णास श्वास घ्यायला त्रास होतो. अनेकदा लक्षणांची कारण कळून येत नाही.
●आधुनिक शास्त्रानुसार या आजारापासून बचाव म्हणजे कोरोनाची लागण होऊ न देणे हे आहे. अद्याप या विषाणूचा उपचार करण्यासाठी कोणतेही प्रभावी औषध नाही ,म्हणूनच सौम्य लक्षणे दिसत असतानाच आजार वाढण्याआधी वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत.

●कोविड झाल्यानंतर -थोडे चालले की दम लागणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, थोडे काम केले की लगेच थकवा येणे, उत्साह नाहीसा होणे, चिडचिड होणे, मानसिक ताण तणाव लवकर येणे, सहनशक्ती कमी होणे ही लक्षणे व्यक्तीनुरुप कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. ‘ फुप्फुसांची कार्यशक्ती ‘ कमी होणे हे यामागे प्रमुख कारण आहे. कोविडच्या संसर्गात फुफ्फुसांच्या पेशींची रचना बिघडून कार्यक्षमतेवर परिणाम होतो, हेच ते ‘Pulmonary Fibrosis’
यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी Post Covid- मध्ये आयुर्वेदीय उपचार घेतल्यास ‘Pulmonary Fibrosis’ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लक्षणात खूप चांगला आराम मिळू शकेल. रसायन चिकित्सा तसेच अपुनर्भव चिकित्सा अशा उपचार पद्धतीचा आयुर्वेद शास्त्रानुसार या अवस्थेत उपयोग होतो.

च्यवनप्राश’- सर्व प्रकारचा खोकला (कास), दम लागणे (श्वास) या सर्वांचा विनाश नियमित च्यवनप्राश’ सेवन केल्याने होतो.
क्षत:- उर:क्षत फुप्फुसांमध्ये झालेली जखम,बिघडलेली रचना, झालेली हानी भरून निघते.
-• उरोरोग – फुफ्फुस संदर्भातील सर्व आजारांत च्यवनप्राश उपयुक्त आहे.
Post Covid मध्ये आलेला थकवा, दौर्बल्य यामुळे कमी होते
•बुद्धी स्मृती एकाग्रता यावर उत्तम असल्याने शारीरिक व मानसिक स्थैर्य मिळते.

‘ स्निग्धैरादौ स्वेदैरुपाचरेत:– (चरक संहिता)
हिक्का (उचकी), श्वास (दमा), यांमुळे फुफ्फुसांची झालेली हानी या विकारात सर्वप्रथम सैंधव मीठ आणि गाईचे तूप किंवा तिळाचे तेल एकत्रित करून गरम करणे व छातीला पुढे व मागे त्याने मसाज करणे हा आहे.
स्नेहोपचार हे झाल्यानंतर गरम पाण्याचा शेक किंवा पुरचुंडीचा शेक त्याठिकाणी देणे. यामुळे प्राणवह स्रोतसांची ( Respiratory Tract System ) ची छिद्रे मृदु होतात, त्यामुळे फुफ्फुसांत जो घट्ट कफ Covid infection मुळे जमा झालेला आहे चिकटलेला आहे तो पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे विलोम झालेला वायू अनुलोम होतो, म्हणजेच वाताची गती प्राकृत होते, आणि रुग्णास बरे वाटते, दम लागण्याचे प्रमाण कमी होते.

● Post Covid मध्ये बरेच दिवस ‘ कोरडा खोकला’ (शुष्क कास) दिसून येतो यामध्ये ‘ एलादि वटी’ खूप उपयुक्त आहे.पुष्कळ दिवस दम लागणे, ताप येणे, उचकी येणे, थुंकीतून रक्त येणे, पार्श्व शूल- बरगड्या मधील स्नायूंचे दुखणे वारंवार खोल खोकल्याने हा त्रास होतो ,या सर्वांमध्ये उपयुक्त आहे.

फुफ्फुसांचे बल उत्तम राहण्यासाठी ‘ लक्ष्मी विलास रस’ ‘ महालक्ष्मी विलास रस ‘ ‘श्वास कास चिंतामणी’ ‘ शृंगाराभ्र रस’ यापैकी व्यक्ती व प्रकृतीनुसार औषधांचे, आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने काही दिवस सेवन करावे.(Pulmonary Fibrosis मध्ये खूप उपयुक्त अशी औषधे आहेत.

● प्राणायाम ,योगा, खोल श्वासांचे योग ,दीर्घ श्‍वसन ,अनुलोम-विलोम, कपालभाती, ध्यानधारणा यामुळे फुप्फुसांची कार्यशक्ती वाढते.

●पथ्य पालन कोविड होऊन गेल्यानंतर ही काही दिवस पथ्य पाळणे फुप्फुसांची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी करणे गरजेचे आहे यामध्ये प्रामुख्याने अभिष्यंदि आहार(कफ दोष वाढविणारा आहार) दही, उडीद असे पदार्थ टाळावेत.
•तसेच विरूद्ध आहार
milk Shake, व इतर पदार्थ.
शीतोष्णक्रमसेवनात – म्हणजे थंड पाणी पिऊन त्यावर गरम चहा /दूध घेणे, अर्धा तास ac मध्ये बसून बाहेर जाणे पुन:परत लगेच ac च्या वातावरणात बसणे या क्रियेमुळे दोषांचे असंतुलन होऊन कफ वाढून, फुफ्फुसांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
●’Pulmonary Fibrosis’झाल्या नंतर दिसून येणारी लक्षणे आयुर्वेदात वर्णित उरःक्षत या व्याधी प्रमाणे आहे. त्यामुळे यातील पथ्य पाळल्यास Covid नंतर दिसून येणारे या आजारांपासून लवकर मुक्ती मिळू शकते.
पथ्य – द्राक्ष ,मनुके, कोहळा, दुधी भोपळा, दूध-तूप ,मूग जुने तांदूळ, ज्वारी ,खजूर, असा सात्विक आहार असावा.
अपथ्य– तेलकट, तुपकट, उष्ण,फरसान व बेकरीचे पदार्थ, शिळे अन्न, थंड पदार्थ ,कृत्रिम पेय, दही आंबवलेले पदार्थ टाळावेत.
●ताकदीच्या बाहेरचे काम, जास्त बोलणे ,प्रदूषण ,खराब वायूशी संपर्क,ही कारणे टाळावीत .शक्य असल्यास हवापालट करावा .ताप सर्दी खोकला येऊ देऊ नये.
●सात्विक आहार ,भरपूर विश्रांती, किमान श्रम व शक्य तेवढे म्हणून या सर्वांचे उत्तम स्वास्थ्यासाठी पालन करावे.

वै. सुहास शिंदे

मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444

back-to-top