Manomay

Post Covid – Heart Disease & Ayurvedic Management


‘कोरोना’
हा ‘फुप्फुसाचा आजार’ असल्याचा विचार करताना त्यात मुख्यत्वे करून अनेकांना धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होणे ही लक्षणे दिसतात परंतु संशोधनाचा वाढता अभ्यास असे दर्शवतो की हृदयावर ही याचे परिणाम होऊ शकतात.
संशोधनात असे दिसून आले की करणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते किंवा काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो जे लोक 65 किंवा त्याहून अधिक वयाचे किंवा दीर्घकालीन आजाराने पीडित आहेत, त्यांना कोरोना संसर्गामुळे हृदयाच्या गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असू शकतो परंतु त्यापेक्षा कमी वयाचे निरोगी लोक ही यामुळे बाधित होऊ शकतात.
यात दिसून येणारी लक्षणे –
– हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त होणे
– हाताला किंवा घोट्याला /टाचेला सूज येणे
– अकारण घाम येणे .
– खांदा दुखणे
– जबडा दात किंवा डोकेदुखी
– श्वास घेण्यात अडचण
– छातीत जळजळ किंवा अपचन अशी लक्षणे covid झाल्यानंतर दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन तपासणी व उपचार सुरू करावेत.
– सतत खोकला fluid Retention मुळे भूक लागत नाही, वजन वाढू शकते, सारखे लघवीला जावे लागणे.
ऑक्सफर्ड जर्नल ने नुकताच कंडवर केलेल्या अभ्यासात समोर आले आहे की- कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या जवळपास 50% Hospitalized रुग्णांचे रिकव्हरी नंतर महिनाभरात हार्ट डॅमेज झाले आहे त्यामुळे बरे झाल्यानंतर ही Heart Rate नियमीत तपासणी आवश्यक झाले आहे.
कोरोना Infection झाल्यानंतर शरीरात Inflammation होते ज्यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात यामुळे हृदयाच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो व Blood Clotting ची समस्या निर्माण होऊ शकते.
दुसरे म्हणजे हा virus थेट आपल्या Receptor cells वर हल्ला करतो याला ACE-2Respectors म्हणतात. तो ‘मायोकार्डीयम टिश्यूज’ म्हणजेच हृदयाच्या या पेशी मध्ये जाऊन ‘मायोकर्डायरिस’ म्हणजे हद्याच्या स्नायूंचे ‘Inflammation’ याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ‘हार्ट फेल्युअर’ होऊ शकते आणि ज्यांना आधीच हृदय रोगाचा आजार आहे, उच्च रक्तदाब आहे अनियंत्रित मधुमेह आहे अशा रुग्णांची समस्या वाढू शकते.

व्हायरल आजारानंतर रुग्णांना हृदयाचे स्नायू कमजोर होणे ( Chronic Heart muscle weakness ) हृदयाचा आकार मोठा होणे ( Cardiac enlangment ) आणि ‘ ( low Heart Ejection Fraction ‘ ची तक्रार असते यालाच ‘ Dialated
Cardiomyopathy ‘ म्हणतात.कोविड इन्फेक्शन नंतर ‘card ionmyopathy’ अधिक घातक ठरू शकते त्यामुळे ‘Heart failure’ होऊ शकते.
हे टाळण्यासाठी तज्ञां नुसार ज्या व्यक्तींना कोरोना नंतर
छातीत दुखण्याची तक्रार आहे, अथवा संक्रमणा पूर्वी पासून ज्यांना हृदयाचे आजार आहे. त्यांनी याबाबत तपासणी करायला पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने – छातीचा X-ray,E C G , गरज पडल्यास 2d ECHO , रक्त तपासणीत D- dimer ,
CPK – MB , Trop – T अशा तपासण्या केल्या जातात.

आयुर्वेदिकउपचार :-
“Prevention is always better than cure” – यानुसार कोरोना होण्यापूर्वीच सर्वांनी विशेषतः ज्यांना हदयाचा त्रास आहे त्यांनी नियमित व्यायाम योग प्राणायाम करणे. सकस व सात्विक आहार घेणे.
– हृदयाचे स्नायू सक्षम रहावेत तसेच रक्ताभिसरण उत्तम राहून हृदयाचे कार्य अविरत चांगले राहावे यासाठी आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्मातील ‘ बस्ती ‘हृदबस्ती ‘ या उपचारांचा खूप छान उपयोग होईल. अगदी post covid मध्ये सुद्धा या चिकित्सेचा उपयोग होईल.
– वैद्यांच्या सल्ल्यानुसार Post Covidमध्ये हृदयाचेआजार होऊ नये म्हणून – कोविड संसर्ग झाल्यानंतर लगेच किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर- ‘लक्ष्मी विलास रस’ सुवर्णमाक्षिक ‘+’ रक्त पाचक योग ‘ शृंगाराभ्र रस’ पाठाचूर्ण’ अशा औषधांचा खूप उपयोग होतो.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – आचार्य वाग्भटानी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात जे सांगितले ते-
” रुणार्द *मन: शुद्ध सर्व ज्वर विनाशम् ।।”
दयाळु’ व शुद्ध अंतःकरण ‘ हे सर्व ज्वरांचे आजाराचे नाशक आहे .
यामुळे शारीरिक व मानसिक स्थैर्य मिळवून व्याधी विरुद्ध लढण्याची क्षमता मिळते व व्याधी पासून रोगी मुक्त होण्यास मदत होते.


वै. सुहास शिंदे

मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444

back-to-top