Manomay

लहान मुले आणि त्यांचे मानसिक आरोग्य

लहान मुले आणि त्यांचे मानसिक आरोग्य . . .

आताच्या कोरोना काळात जसे मोठ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होतेय तसंच आपण लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे पण जरूरी आहे.

मुलांचा आनंद म्हणजे मित्रांसोबत खेळणे, गार्डन मध्ये खेळणे, शाळेत जाणे, बाहेर फिरायला जाणे, सतत काही न काही खेळणे.

नेमकं हे सगळं आता बंद आहे, मग मुले चिडचिडी झालीये, हट्टीपणा करताय, काहीच ऐकत नाहीये या सगळ्या तक्रारी वाढायला लागल्या.

जी बाळ अगदीच लहान आहे, बोलुही शकत नाही त्यांना तर सांगताही येत नाही की त्यांना नेमकं काय होतंय.

मुलांचे मानसिक आरोग्य छान ठेवणे म्हणजेच मुलं आनंदी राहणे..!! त्यासाठी काही टिप्स,

१. सर्वप्रथम, आपण आनंदी आहोत का हे बघा, तुम्ही तणावात असाल तर मुले कशी आनंदी राहणार? तेव्हा आधी तुमचं मन छान आनंदी आहे का या कडे लक्ष द्या.

२. मुलांकडे भरपूर एनर्जी असते, तेव्हा ते घरात पळणे, उड्या मारणे, मस्ती करणे हे सर्व करणारच, त्यांना ते करू द्या. सतत त्यांना हे नको करू…ते नको करू..अरे शांत बस..असं बोलू नका. मुळात मुलं जे काही करत असतील त्यामुळे त्यांच आणि इतरांचं काही नुकसान होणार नसेल तर त्यांना ते करू दया,

३. आपण मुलांना काही सूचना दिल्या आणि मुलं तस वागली नाही तर आपलीच चिडचिड वाढते. तेव्हा कमी बोलणे गरजेचे आहे.

४. शारीरिक व्यायाम, मेडिटेशन, नामस्मरण या गोष्टी सुद्धा मुलांच्या रोजच्या रुटीन मध्ये असायला हव्या.

५. जर मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिड, रडणे, घाबरणे, झोप न येणे, भूक न लागणे यांसारखी लक्षणे 1 आठवड्या पेक्षा जास्त काळासाठी दिसत असतील तर डॉक्टर आणि समुपदेशक यांना दाखवणे गरजेचे आहे.

६. योग्य आहार, योग्य झोप आणि खेळण्याचा आनंद मुलांसाठी गरजेचा आहे.

 

वात्सल्य हाइट्स, शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444
www.manomayhealthcare.com

back-to-top