Manomay

मलावष्टंभ(constipation) – भाग 2 [ औषधी चिकित्सा ]

मलावष्टंभ(constipation) – भाग 2 [औषधी चिकित्सा]

१) ताजे आवळे: –
रोज दोन ते तीन ताजे चांगले पक्व झालेले अर्थात पिकलेले आवळे सकाळी चावून खावेत. किंवा शिजवून खावेत त्यामुळे पोट साफ होते. यकृताचे कार्य सुधारून भूक लागते, अन्न पचन होते. आवळे पौष्टिक,कांती वाढवणारे , बल्य व रसायन असे आहे. याच्या नियमित सेवनाने वार्धक्याचा नाश होतो. यामुळे त्रास काहीच होत नाही उलट आग कमी होते, रक्तस्त्राव थांबतो. आवळा पित्त कमी करतो व रक्तातील अतिरिक्त साखरही कमी करतो

२) बाहावा मगज: –
20 ग्रॅम बाहवा मगज १ कपभर गरम पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. सकाळी त्याच पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून प्यावे. रोज सकाळी अनशापोटी घ्यावे. बहावा अत्यंत शीत(थंड), मृदू, व गोड औषध आहे. यामुळे आतड्याला कोणतीही इजा न पोहोचता पोट साफ होते. मलबद्धतेमुळे पोटात व छातीत होणारी आग सुद्धा यामुळे कमी होते.

३) एरंड तेल: –
एरंड तेल एक- दोन चमचे पोटात घेतल्यास पोट साफ होते.
त्यापेक्षा अधिक घेतल्यास मोठमोठे पाण्यासारखे जुलाब होतात.
मलसंचयाचा परिणाम म्हणून कंबर दुखी, पाठ दुखी, सांधेदुखी ही वाताची लक्षणे असताना एरंडेल तेलाचा जरुर वापर करावा.
पोटात आग, चक्कर येणे, घेरी येणे, अति तहान लागणे अशी लक्षणे असताना एरंड तेल घेऊ नये. एरंड तेल घेतल्याने फार जुलाब झाल्यास त्यावर तूप व गरम भात खावा म्हणजे जुलाब थांबतात.

४) सोनामुखी :-
सोनामुखी चूर्ण दोन ग्रॅम सकाळी साखरेच्या पाण्यासोबत घ्यावे. यामुळे ४-५ तासांनी चांगले मोठे जुलाब होतात. सुरुवातीला मलाचे खडे पडतात, मग शौचावाटे पित्त पडते व नंतर कफही पडतो.
सोनामुखी तीव्र विरेचक आहे यामुळे पोटात कळा व मुरडा येतो. त्यावर तूप व गूळ एकत्र करून खावे. सोनामुखी दीर्घ काळ घेऊ नये व वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी.

५) निशोत्तर :-
पाच ग्रॅम निशोत्तर चूर्ण साखर पाण्यासोबत घ्यावे त्यामुळे पाण्यासारखे पातळ जुलाब होतात.
पिवळ्या रंगाचे पित्त शौचावाटे बाहेर पडते पक्वाशयात मलसंचय जास्त झाल्यास निशोत्तराचा वापर करावा.
यकृताचे कार्य मंदावल्यामुळे पित्ताची उत्पत्ती कमी होत असेल तर यकृताला उत्तेजित करून पित्र स्त्राव निर्माण करण्याचे काम निशोत्तर करते व त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते.
छातीत व पोटात आग, जळजळ डोकेदुखी, डोक्या नंतर पोट दुखणे या पित्तप्रधान लक्षणांत निशोत्तर वापरावे.

६) सुरवारी हिरडा :-

– दीर्घकालीन मलावरोधात व मलसंचयाचा परिणाम म्हणून जे दुष्परिणाम शरीरावर होतात, त्यावर सुरवारी हिरडा हे सर्वोत्कृष्ट औषध आहे.
५ ते १० ग्रॅम चूर्ण पाण्याबरोबर
रात्री द्यावे.१० ते १२ तासांनी पोट साफ होते. हिरडा अनेक दिवस किंवा रोज घेतला तरी शरीराला काहीच त्रास होत नाही .उलट हिरड्या मुळे भूक लागते,
अन्न पचन होते .पोट साफ होते. रक्तवाहिन्या निरोगी राहतात व सर्व शरीराला भरपूर रक्तपुरवठा होतो त्यामुळे अखंड तारुण्य राहते. वार्धक्य येत नाही व दीर्घकाळापर्यंत जगता येते .

सुरवारी हिरडा वापरण्याच्या काही विशिष्ट अवस्था –

i) पचन मार्गाची शिथिलता :-
अन्नपचन नीट होत नाही.
शौचाला कधी पातळ होते तर कधी खडा होतो अशावेळी हिरडा चूर्ण रोज रात्री तूप व मधा सोबत घेणे.

ii) मेदोवृद्धी – १० ग्रॅम हिरडा चूर्ण सकाळी व संध्याकाळी मध व पाण्यासोबत घेणे.

iii) Liver ला सूज येणे, Ascitis – पोटात पाणी होणे, सूज येणे, रक्त कमी होणे व कावीळ यावर उपयुक्त

iv) हृद्रोग – हिरडा सहाणेवर उगाळून मधासोबत चाटवावा. ६ महिने घेणे .

V) मूळव्याध – मूळव्याधीवर एरंडतेलात तळलेल्या हिरड्याचे चूर्ण कोमट पाण्यासह रात्री झोपताना घ्यावे.

Vi) अंगास खूप घाम येणे व नाक वाहणे.

Vii) मानसिक अस्वास्थ्य.

वरील सर्व औषधे रुग्णाचे बल, काल , प्रकृतीनुसार वापरायची असतात. म्हणून वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत.

मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
Contact: 7350314444

back-to-top