मलावरोध ( मलावष्टंभ)-भाग 1 [Constipation]
मलावरोध ( मलावष्टंभ )-भाग 1
constipation.
आहार चिकित्सा.
●भात, भाकरी/चपाती, भाजी,आमटी, लिंबू,मीठ, चटणी, कोशिंबीर, दूध, दही, लोणचे, पापड हा आपल्या,लोकांचा नित्याचा आहार आहे .हा अत्यंत समतोल व शास्त्रीय आहार आहे. हे सर्व पदार्थ योग्य प्रमाणात , ठराविक वेळी ,नीट चावून खाल्ले पाहिजेत त्यामुळे अन्नपचन, शरीर पोषण, मलविसर्जन ह्या क्रिया नीट होऊ शकतात व आरोग्याचा लाभ होतो. आहारात नुसता भात किंवा नुसती चपाती, रव्याचे किंवा मैद्याचे पदार्थ खाण्यात असू नयेत. अशा
पदार्थांच्या रसांचे आतड्यां मार्फत शोषण होते व शेष मलभाग आतड्यात कमी उरतो, त्यामुळे पोट साफ होत नाही- यासाठी हातसडीच्या तांदूळाचा भात, घरच्या गव्हाचा रवा खावा.
हे जाडे भरडे अन्न पोटात गेले म्हणजे आतड्यांना चालना मिळते व पोट साफ होते.
●मूग, मटकी,मसूर, हरभरा, वाटाणा ही कडधान्ये मलबद्धता निर्माण करतात. त्यासाठी ही कमी प्रमाणात खावी.
●आहारात ताज्या भाज्या असाव्यात चाकवत, चुका, मेथी, अळू, यामुळे पोट साफ होते. मात्र त्या नीट शिजवलेल्या असाव्यात. मलावष्टंभ असणाऱ्या रुग्णांनी नित्य खाव्यात.
● द्राक्षे, सफरचंद, करवंदे, संत्री, मोसंबी, आंबा, लिंबू, आवळा, ही आंबट – गोड व रसाळ फळे अन्न पचनास व पोट साफ करण्यास मदत करतात.
● सुके अंजीर , मनुका, खोबरे, बदाम, पिस्ते ,चारोळी हा सुकामेवा (Dry Fruits)खाल्ल्याने पोट साफ होते.
● रोज ताजे दूध प्यावे .धारोष्ण असेल तर फार उत्तम. त्या पासून शरीर पुष्ट होते व पोट साफ होते. मात्र उकळून त्यावरील साय काढून टाकलेले दूध पिल्याने पोट साफ होत नाही.
● देशी गाईचे तूप :- 20 ग्रॅम तूप व 1/2 ग्रॅम व सैंधव मीठ एकत्रित करून सकाळी चाटावे व त्यावर पेलाभर गरम पाणी रोज सकाळी प्यावे . त्यामुळे कोठा स्निग्ध होऊन पोट साफ होते.
यामुळे जुनाट व दीर्घकालीन मलावरोधाची सवय सवय मोडते व मनुष्य निरोगी ,दीर्घायुषी होतो.
● काळे तीळ :- स्वच्छ काळे तीळ रोज सकाळी मूठभर नीट चावून खावेत त्यावर थोडी खडीसाखर व १ ग्लास थंड पाणी प्यावे .
यामुळे शरीर पुष्ट होते. जन्मभर दात बळकट राहतात व मलबद्धतेचा त्रास कायमचा दूर होतो.
● बदाम बी :- अंगावरचे दूध पिणाऱ्या बालकांना आणि लहान मुलांना कित्येक वेळा शौचास साफ होत नाही. मलाचा खडा होतो.
अशा वेळी बदाम बी चा चांगला उपयोग होतो .बदाम बी दुधात उगाळून बाळाला चाटवावी.
व त्यावर ताजे रोजचे दूध पाजावे. ब दामामुळे कोठा मृदु होऊन , मलाचा,खडा होण्याची सवय मोडते. हा प्रयोग सलग 15 दिवस ते 1महिना करावा लागतो.तरच त्याचे लाभ दिसून येतात.
● मनुका :- काळे मनुके स्वच्छ धुवून त्यावरील काड्या व बीया काढून टाकाव्यात. अशा मूठभर मनुका रोज थंड पाण्यात तासभर भिजत ठेवणे व रात्री ते खावे .यामुळे पोट साफ होते. तसेच पोटातील व लघवीची आग सुद्धा कमी होते.
● शेंगदाणे :- मुठभर रोज चावून खाल्ल्याने पोट साफ होते. परंतु शेंगदाण्या मुळे- चक्कर ,घेरी, उलटी, पित्त ,मुळव्याध, त्वचारोग, होण्याची भीती असते. म्हणून यांचा कधीतरीच उपयोग करावा. नेहमी नको.
●पोहे, चिरमुरे, भाताच्या लाह्या, डाळी, हरभरा डाळ, डाळीचे पदार्थ- पिठले, भजी, शेव इ. तसेच चिवडा, चकली , फरसाण, असे तेलकट व तेल किंवा डालड्यात ( वनस्पती तूप ) तळलेले पदार्थ पचायला जड होतात व मलावरोध निर्माण करतात.
अशा प्रकारे या आहारीय द्रव्यांचा आपल्या आहारात वापर केल्यास दीर्घकालीन व जुनाट मलावरोधाची सवय संपूर्णपणे नष्ट होईल.
मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444
