मलावरोध आणि तारूण्य ( मलावष्टंभ-भाग 4 )
✎ मलावरोध आणि तारूण्य (Constipation in young Generations)
● आयुर्वेदाने आयुष्याच्या बाल, तरूण व वृद्ध अशा अवस्था मानलेल्या असून त्यामध्ये अनुक्रमे कफ, पित्त व वात हे दोष वाढतात, असे सांगितले आहे.म्हणजे वास्तविक आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने तारूण्या मध्ये पित्त दोष वाढत असतो.तसेच आयुर्वेदाने पित्ताचा ‘सर’ असा महत्वाचा गुण सांगितला आहे. या ‘सर’ गुणाने पित्त स्वतःच शौचाला मदत करणारे आहे. असे असेल तर मग तारुण्यात मलावरोध होऊच नये असे म्हणता येईल.परंतु तरीही तारूण्यात मलावरोधाची तक्रार दिसून येते.
याची कारणे आणि त्यावरील चिकित्सा :
● अवेळी खाणे, पिणे किंवा रात्री जागरण इत्यादी कारणांमुळे शरीरातील उष्णता प्रमाणापेक्षा अधिक वाढते. परिणामी शरीरातील स्निग्धता कमी होण्यास ही उष्णता कारणीभूत ठरते.व त्यामुळे साहजिकच पित्ताचाही स्निग्ध हा गुण कमी होऊन त्याचे ‘सरत्व’ कमी होते.आणि याचा परिणाम म्हणून मोठ्या आतड्यात रूक्षता(dryness) म्हणजेच कोरडेपणा वाढून मल पुढे ढकलण्याची आतड्याची प्रवृत्ती कमी होते .किंवा मलाला
कोरडेपणा आल्यामुळे आतड्याची नेहमीची शक्ती अपुरी पडते व मलावरोध हे लक्षण दिसून येते.
● अशावेळी स्निग्ध पण सौम्य अनुलोमन करणारी द्रव्य उपचारांसाठी वापरावीत . मुख्य म्हणजे घडलेली अपथ्ये लक्ष देऊन काळजीपूर्वक कमी करण्याचा प्रयत्न करावा .सौम्य अनुलोमन म्हणून काळा मनुका, आवळकाठी चूर्ण, बाहवा मगज अशी औषधे तूप व कोमट पाण्याबरोबर रात्री झोपताना घेतल्यास आतड्यास एक प्रकारचा स्निग्ध पणाही निर्माण होतो तसेच ही औषधे स्वभावताच: च थंड असल्यामुळे शरीरातील वाढलेली उषणातही कमी होण्यास मदत होते. स्निग्ध अशा तूपासोबत घेतल्यामुळे आतड्याची रुक्षता कमी होऊन ते पूर्वीप्रमाणे काम करू लागते आणि मलावरोधाची तक्रार दूर होते.
● तारुण्यामध्ये बऱ्याच वेळा मलावरोधाचे कारण -शरीरातील सर्वात शेवटचा पण महत्वाचा धातु जो ‘शुक्र’ यावर परिणाम झाल्यामुळे म्हणजे कमी झाल्यामुळे मलावरोध होऊ शकतो. स्वप्न दोष (night fall) ,
हस्त मैथुन(masturbation), अतिव्यवाय (frequent intercourse) या कारणांमुळे शरीरातील सर्वात महत्त्वाचा पण स्निग्ध असणारा ‘शुक्रधातू’ कमी होतो. शरीरात रूक्षता तसेच उष्णताही वाढते. शरीराची शक्तीही कमी होते. परिणामी आतड्याला हि कोरडेपणा येऊन मलावरोध होऊ शकतो.
● अशावेळी शरीराची ताकद वाढविणारे, शुक्रधातू वाढवणारे व स्निग्ध अशा प्रकारचे उपचार केल्यास लवकर बरे वाढण्यास मदत होते. अशावेळी शतावरी कल्प २/२ चमचे दुधातून दोन वेळा देणे, च्यवनप्राशावलेह , अगस्ती हरितकी लेहा सारखी रसायन औषधे वापरण्याने रुग्णास त्वरित परिणाम झालेला दिसून येतो. कमी झालेले शुक्र परत वाढले की, त्याचे उपद्रव म्हणून निर्माण झालेली मलावरोध यासारखी लक्षणे अशा औषधोपचारांनी लगेच कमी होतात.
● आज-काल तरुणांना नोकरी (career) किंवा शिक्षण या निमित्ताने मिळेल त्या गावी जाऊन राहणे भाग पडते. अशावेळी तेथील हवामान, पाणी इतर खाण्या-पिण्याच्या सवयीचा फरकही मलावरोध निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. मात्र असा झालेला बदल प्रथम बऱ्याच वेळा अग्निमांद्य( पचन शक्ती कमी होणे) निर्माण करून झालेला असतो. त्यामुळे अशावेळी अग्नि (digestive fire) वाढवणारे उपचार करावे लागतात.
● भास्कर लवण चूर्ण, शिवा क्षार पाचन चूर्ण, हिंगाष्टक चूर्ण अशी औषधे १ चमचा गरम पाण्यातून जेवणावेळी घेतल्यास लवकर फायदा होतो.
● मानसिक ताण (strees) काही वेळा परीक्षा, नोकरी ,घरगुती अडचणी यामुळे मनावर येणारा ताण अशा कारणांनी ही मलावरोध होऊ शकतो. अशावेळी चिंता जास्त केली जाते. व परिणाम शरीरातील उष्णता वाढून रुक्षता वाढते. आणि आतड्यांना ही कोरडेपणा येऊन मलावष्टंभ होतो.
● अशावेळी मनावर काम करणारी औषधे द्यावी लागतात. अशावेळी जटामांसी चूर्ण, विदारीकंद चूर्ण ,शतावरी कल्प, अश्वगंधा चूर्ण, आवळकाठी चूर्ण अशा पद्धतीची औषधे घ्यावीत. सामान्यतः अर्धा चमचा प्रमाणात गरम पाणी किंवा कोमट दुधातून घेतल्यास लवकर परिणाम दिसतो.
● मलबध्दतेच्या विकाराने पिडीत तरुण जाहिरात पाहून त्यातील उपचार करून घेतात. मग त्या औषधांनी जुलाब होऊन कोठा साफ झाला , अशा समजुतीने पुन्हा नेहमीप्रमाणे दीर्घकाळ सेवन केले जाते. परंतु यामुळे मलबध्दतेचा विकार वाढतच राहतो,व इतर विकार होण्याची ही शक्यता वाढते. यासाठी वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य होय. कारण वैद्यास प्रकृतीचा, ऋतु मानाचा मलावरोध यांच्या कारणांचा ई. विचार करूनच औषधांची निवड करावी लागते यासाठी विशेषतः तरुणांनी या सूचनेकडे काळ जीपूर्वक लक्ष देऊन तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे योग्य होय. तसेच ऐन तारुण्यात मलावरोधासारख्या विकाराला बळी पडण्याऐवजी योग्य वेळी योग्य पद्धतीने आहार-विहार करून प्रसंगी पथ्य पाळून मलावरोध याकडे लक्ष द्यावे हेच योग्य नव्हे काय? सारके किंवा रेचके घेतल्यास मलावरोध नाहीसा होऊन बरे वाटते अशी समजूत बरोबर नाही. यामुळे उलट सर्व मळ शरीरा बाहेर जाऊन थकवा तर येतोच पण दुसऱ्या दिवशी पण मलावष्टंभ होऊन राहतो. म्हणून शास्त्रीय पद्धतीने च त्या औषधांचे सेवन करावे.
● पुण्या-मुंबईसारख्या औद्योगीकरण झालेल्या शहरांमध्ये नोकरीवर जाण्याची गडबड असते. मलप्रवृत्ती साठी वेळ जास्त लागत असल्यास तेवढा वेळ दिला जात नाही. मग लोकल किंवा बस मध्ये कुठेतरी मल वेग येतो. आणि मग वेग अडविण्याशिवाय उपाय राहत नाही,अधारणीय वेगांचे धारण होते;हे प्रकृतीच्या नियमा विरुध्द आहे. यामुळे मलावष्टंभ विकार होण्याची खात्री वाढते.आणि तरुण या तक्रारीमुळे त्रस्त होऊन जातात. यासाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात आहार-विहार केल्याने असा प्रसंग उद्भवणार नाही अशी काळजी घेणे योग्य ठरते.
अशाप्रकारे तरुणांना होणाऱ्या मलावष्टंभाची कारणे, लक्षणे आणि उपचार आहेत.
मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444
