जागतिक छिन्नमनस्कता दिन ( World Schizophrenia Day ) – 24 May
# World Schizophrenia Day #
# जागतिक छिन्नमनस्कता दिन #
‘ स्किझोफ्रेनीया’- ‘छिन्नमनस्कता’ म्हणजे एक ‘विभ्रमावस्था’ वास्तव आणि कल्पित यातील सीमारेषा पुसून टाकणारा भयावह अनुभव. ही अवस्था अतिशय घाबरवणारी आहे. या बौद्धिक अवस्थेत एखाद्या व्यक्तीची ‘आकलनशक्ती’ आणि ‘वास्तविकतेच्या संकल्पना’ विकृत होतात.
लक्षणे :-
•असमंजसपणा.
•भ्रामकता.
•गोंधळाची वर्तणूक.
•अनिष्ट सामाजिक संवाद.
● किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येणारी लक्षणे :-
•चिडचिडेपणा.
•प्रेरणेची कमतरता.
•झोपेच्या समस्या.
● प्रौढांमध्ये दिसून येणारी लक्षणे : –
•व्यापक असमंजसपणा.
•वास्तविकतेचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे.
•आपल्यावर कोणी प्रेम करत नसल्याची, आपली छळवणूक होत असल्याची, किंवा आपल्या विरोधात कट कारस्थान रचत असल्याची भावना असणे.
या सर्व असमंजसपणाच्या व्यापक अवस्था दिसून येतात.
• संभ्रमितपणा – अस्तित्वात नसलेले संवेदनात्मक अनुभव येणे. उदा- नसलेला आवाज ऐकायला येणे. बरेचदा अनुभवास येते.
•तुटक संवादाचे भिन्न प्रकार दिसतात. त्यात प्रश्नांची व प्रासंगिक उत्तरे देणे, बोलताना चुकीचे उच्चार करणे आणि संरचना नसलेली किंवा अर्थ नसलेली वाक्ये वापरणे यांचा समावेश होतो.
•विक्षिप्त वर्तन असणे.
•अप्रगत बालपणा असणे.
•अचानक पणे स्फोटक क्रोध आणि उत्तेजना येणे.
•सूचना घेण्यास व पालन करण्यास नेहमी विरोध करणे.
•भरपूर आणि निरर्थक हालचाली करणे.
•सामान्य क्रियांमधील स्वारस्य कमी होणे-यामध्ये प्रामुख्याने लोकांशी संवाद साधणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, भावनिक रीत्या अभिव्यक्त होणे व आनंद मिळवणे या गोष्टींचा समावेश होतो.
● उपचार : –
●आधुनिक शास्त्रानुसार
सिक्रझोफेनिया’ या विकारात
‘अँटीसायकोटिक’
( Anti-psycotic ) औषधे निर्धारित केली जातात.
●औषधांच्या मर्यादित किंवा प्रतिकूल परिस्थितीच्या बाबतीत, ‘विजेच्या झटक्याचा’ उपचारांचा (Electric Shock Stimulation) सल्ला दिला जाऊ शकतो.
●संभ्रमित अवस्था जास्त असल्यास मेंदूच्या काही भागात चुंबकीय पद्धतीने उत्तेजना तयार करणे उपयुक्त ठरते.
● स्क्रिझोफेनिया आणि आयुर्वेदीय उपचार.
‘स्क्रिझो’ विकारग्रस्त रुग्ण बहुधा ‘असाध्य’ म्हणून मानले जातात. रोगी पूर्णपणे रोगमुक्त झाला असे खूप कमी वेळेस घडते.
संबंधित रुग्णास दैनंदिन जीवन शैली आणि निसर्गापासून दूर ठेवल्यास, कैद्यासारखे कोंडून ठेवले तर रुग्ण कधीच बरा होणार नाही असे दुर्दैवी भविष्य ‘आयुर्वेदीय वैद्यांस’ ईच्छा नसताना सांगावे लागते.
आचार्य चरकाचार्यांनी रूग्णांबद्दल नेहमी ‘कणव’(Compassion)असली पाहिजे,असा मंत्र सर्वांना दिलाय.
हे तत्व आचरणात आणून-वैद्याने व रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णांची काळजी घेतली तर निश्चितपणे रुग्ण बरा होऊ शकतो.
•संबंधित रूग्णांस पूर्ण खबरदारी घेऊन पूर्वाश्रमीच्या मित्रमंडळींबरोबर काही काळ घालू द्यावा. मोकळ्या हवेत फिरायला न्यावे.
●पथ्य :- सात्विक व ‘कमी अन्नराशी’ असलेला आहार द्यावा.
सायंकाळी कटाक्षाने सूर्यास्तापूर्वी जेवण करणे; पचण्यासाठी हलके असे अन्नपदार्थातील घटक असावेत.
● अपथ्य :- खूप शारीरिक ताकद वाढेल असे खाद्यपदार्थ टाळावेत.
●रुग्ण मानसिकदृष्ट्या तयार असल्यास किमान सहा सूर्यनमस्कार, दीर्घश्वसन, प्राणायाम यांचा उपयोग करावा.
●संपूर्ण अंगाला विशेषतः डोके, कानशिले, कपाळ व तळहात, तळपाय याठिकाणी –
‘शतशौत घृताने’ बाह्य स्नेहन म्हणजे हलक्या हाताने मसाज करणे.
●तज्ञांच्या देखरेखीखाली- पंचकर्मातील- ‘बस्ती’, ‘शिरोधारा’, ‘नस्य’ या उपचारांचा प्राथमिक अवस्थेत चांगला उपयोग होतो.
●आयुर्वेदातील ‘मानसोपचारावरील’औषधांचा रुग्णांच्या प्रकृतीनुरूप उपयोग केल्यास खूप लाभ होऊ शकतो उदा.- ‘ब्राह्मी वटी’, ‘पंचगन्य घृत’, ‘महाकल्याणक घृत’ ,
‘सारस्वतअरिष्ट’ अशी औषधे.
वै. सुहास शिंदे( लंगोटे)
मनोमय आयुर्वेद आणि पंचकर्म.
1st फ्लोअर ज्ञान कमल हाईट्स बँक ऑफ महाराष्ट्र लांडेवाडी चौक भोसरी पुणे 39.
📱-9075029444.
www.manomayhealthcare.com
