Manomay

केशविकार ( केसांचे आजार ) आणि आयुर्वेदीय उपचार

केशविकार ( केसांचे आजार ) आणि आयुर्वेदीय उपचार.

केसांचा संबंध केवळ ‘अस्थि‘(Bone ) किंवा ‘मज्जा‘ ( Nervous system ) यांच्याशी नसून इतर भवघटकही या सोबत निगडित असतात हे आजपर्यंतचे रुग्ण पाहून दिसून आले.’ केश विकाराचे ‘ कारण समजले की नित्य विहारात नेहमी आढळणाऱ्या केसान बाबतच्या समस्या कशा सोडवाव्यात याचे उत्तर सापडते.

‘रसधातू ‘ व ‘ केश’
•रससार व्यक्तींची त्वचा व रोम , केश हे सुप्रसन्न व मृदू असतात.
•हा रसधातू जर दूषित झाला तर ‘ पलित’ म्हणजे केस लवकर पिकतात.
• अति चिंता, मानसिक ताण – तणाव यांमुळे रसधातू बिघडतो.

मेदधातू व केश :-
• मेदसार व्यक्तींचे लोम ,केस हे स्निग्ध’ असतात.
• त्यामुळे मेदधातू जर दूषित झाला तर केस कोरडे होतात. व गळू लागतात.
•व्यायामाचा अभाव , दिवसा झोपणे , चरबीयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाणे आणि अति मद्यपान यांकरणामुळे ‘ मेदधातू’ बिघडतो.

स्वेद आणि केश :-
_ स्वेद (घाम ) यामुळे केसांचे ‘ सौकुमायं उत्तम राहते.केस मुलायम राहतात.
• ‘स्वेद’ हा मध्यम त्वचेचा स्नेह असून तो केश , रोम यांना धारण करतो.
‘स्वेद’ कमी झाल्यास व ‘स्वेद’- बिघडल्यास केस गळतात, केसांचे आरोग्य बिघडते.
‘अति संताप’ केल्याने स्वेद बिघडतो.
‘शीतोष्ण क्रम’ सेवनाने क्लेद बिघडतो .
शीतोष्ण क्रम म्हणजे थंड पाणी पिऊन त्यावर चहा पिणे, अर्धा तास Ac मध्ये बसून बाहेर जाणे पुन: लगेच Ac मध्ये बसणे. हॉटेल मध्ये प्रथम थंडगार पाणी पिऊन त्यावर गरमागरम उष्ण पदार्थ सेवन करणे या सर्वांमुळे केस गळतात .
• भरपेट जेवल्यानंतर व्यायाम करणे, अतिशय कडक उन्हात जाणे यामुळे केशपतन होते त्वचाविकार होतात .
• आधी उपवास करून मग भरपेट जेवण करणे यामुळेही केसांचे आरोग्य बिघडते.
• भिती, भरपूर श्रम आणि उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये .
अजीर्ण– आधीचे जेवण न पचता पुढील जेवण लगेच करणे( अध्यशन ) यामुळेही केस गळतात.
क्लेद वाढविणारे पदार्थ– नवीन धान्य दही मासे इ. खाल्ल्यानेही केशविकार होतात.
• खारट अतिप्रमाणात खाल्याने केशविकार लगेच होतात.

अस्थि व केश :-
अस्थिधातू बिघडल्यामुळे होणाऱ्या रोगांमध्ये केशरोगांचा समावेश होतो असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात म्हणून केशर रोगांची चिकित्सा करताना अस्थि धातूचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. ‘केश’ हा ‘पितृज’ भाव विशेष – वडिलांचा वारसा म्हणून हा घटक आपल्या शरीरात निर्माण होतो.वातकर अन्नपदार्थ खाल्ल्याने व ‘वात’ वाढल्याने,अस्थि धातू बिघडतो. …

मज्जा धातू व केश :-
•विरुद्ध स्वरूपाच्या आहार-विहाराने मज्जा धातू बिघडतो. उदा. दूध व फळे एकत्र खाणे .
मज्जा म्हणजे मस्तु लुंग मस्तिष्क असेही शास्त्रकार म्हणतात. त्यामुळे Anxiety- चिंता,क्रोध भय यामुळे केस गळतात हे गळणारे केस थांबता थांबत नाहीत त्यासाठी मज्जेवर कार्य करणाऱ्या औषधांची गरज असते.

केशरोगांची चिकित्सा:-
अति प्रमाणात केस गळणे अकाली केस पिकणे असेल तर अशावेळी रसायन औषधांची गरज असते. गोक्षुर +आवळा+ गुळवेल, मध व तुपासोबत नियमित सेवन करणे यामुळे केस घनदाट होतात केस काळे होतात केशव भूमी केसांची मुळे घट्ट व स्वच्छ होतात कोंडा नाहीसा होण्यास मदत होते.
काळे तीळ + आवळा+मका(भृंगराज) एकत्र घेतल्याने केस काळे होतात व ती व्यक्ती दीर्घजीवी होते.
केस काळे करण्यासाठी- बेहडा+भृंगराज+निर्गुंडी+कुरंट यांचा उत्तम उपयोग होतो.
दारूणक – Dandruff कोंडा
केस धुण्यासाठी – • त्रिफळा काढा, शिकेकाई व संत्र्याची साल यांचा वापर करावा. •रात्री झोपताना केशमुळाशी एरंड तेल लावावे, • सकाळी शिकेकाई २ चमचे+ बोरॅक्स पावडर पाव चमचा केस मुळाशी लावून पाऊण तासाने स्नान करावे.
मोरावळा व आवळ्याचे चूर्ण किंवा रस दररोज घेणे.
•खूप जुनाट आजार असल्यास लावण्यासाठी निंबकरंज तेल+ कापूर आणि आभ्यंतर औषध- ‘मेदोपाचक’+कासीस भस्म वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेणे.
खालित्य – केस गळणे.
Typhoid नंतर, प्रसूति नंतर, चिंतेमुळे जास्त केस गळतात. यावर प्रकृतीनुरुप – आवळा, ब्राह्मी,भृंगराज वडाच्या पारंबी चे चूर्ण यांचा वापर करावा.

पालित्य – केस पिकणे कुपोषणामुळे ही असू शकते.
खोबऱ्याचा अधिक वापर खाण्यात असावा.
लोखंडी पात्रात त्रिफळा +मेहंदी+ कारल्याचा रस घेऊन रात्रभर मिश्रण तसेच ठेवणे दुसऱ्या दिवशी सकाळी लावणे आठवड्यातून २ वेळा.
जास्वंदाच्या फुलाचा रस व मध यांचे नस्य करणे.
इंद्रलुप्त:-(चाई पडणे) जास्वंदाची फुले गोमूत्रात वाटून त्याचा लेप लावणे
इंद्रलुप्ता वर परिजातक बियांच्या लेप लावावा.
टक्कल पडले असल्यास कडू पडवळाच्या पानांचा रस लावावा.
याशिवाय शास्त्रोक्त पद्धतीने आज औषधोपचार व पंचकर्म जीवनशैली आहार यांचा समन्वय साधून केसांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राखता येईल.

वै. सुहास शिंदे

मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444

back-to-top